२०२६–२७

शाळेचा पहिला दिवस

“जंगल सफारी” थीममध्ये चिमुकल्यांचे उत्साहपूर्ण स्वागत! 🐘🦒
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत २०२६ – २७ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडली. “जंगल सफारी” या आकर्षक थीममुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मुलांचे औक्षण केले. मोठ्या गटाची काही मुलं प्राण्यांच्या वेशात आली होती, त्यांनी मुलांचे स्वागत केले आणि मुलांचा हात धरून त्यांना शाळेत घेतले.
जंगलातील प्राण्यांच्या देखाव्यांनी सजलेले प्रवेशद्वार, जंगल थीमवर आधारित बालगीते, प्रेमळ स्वागत यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. पालकांनीही या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी, सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण देण्याचा आमचा संकल्प यानिमित्ताने अधिक दृढ झाला आहे. शाळेत होणारे विविध उपक्रम, शिक्षणाची पद्धत आणि पालकांचा सहभाग याविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेधाताई यांनी पालकांशी संवाद साधला.

Scroll to Top