शाळेबद्दल

  • शाळेची स्थापना- १८ जून १९७९
  • १६७ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या ज्ञानवृक्षाची शाखा.
  • ४६ वर्षे पूर्ण झालेली आणि बालगोपाळासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत व वर्गखोल्या खेळण्यासाठी सुरक्षित अंगण असलेली महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक शाळा.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबवणारी शाळा.
  • मुलांसाठी संस्कारक्षम वातावरण असलेली शाळा. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी या माध्यमांचा वापर करून मुलांवर संस्कार केले जातात.
  • निरीक्षण शक्ती, एकाग्रता वाढीस लागणारे शैक्षणिक खेळ, शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ, साहित्य.
  • लहानपणापासून मुलांना इंग्रजीची गोडी लागावी यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य वर्ग आणि सेमी इंग्रजी.
  • १ ली पासून सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश तसेच १० वी पर्यंत शाळा.
  • सण- समारंभ व विविध प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख.
  • विविध शैक्षणिक खेळाची साधने, प्रोजेक्टर व CD चा भरपूर वापर.
  • मुलांना अभ्यासाचे ओझे वाटू नये म्हणून प्रकल्प पद्धतीवर आधारित हसत-खेळत शिक्षण.
  • मुलांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी विविध साधनाद्वारे शिक्षण.
  • स्वतंत्र संगीत वर्ग, चित्रकला व हस्तकला वर्ग तसेच वाचन वर्ग.
  • मुलांना शाळेत येण्याची गोडी निर्माण व्हावी तसेच शाळा आपलीशी वाटावी यासाठी शाळेत चित्रमय व बोलक्या भिंती आहेत.
  • NEP म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाचा अवलंब करून शिक्षण देत आहेत.
Scroll to Top