शाळेचा इतिहास

शाळेचे संस्थापक: कै. वासुदेव बळवंत फडके, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर, कै. वामन प्रभाकर भावे

शाळेचे नाव : म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळा

1979
शाळेची स्थापना

पर्यंत शाळेचे सर्व वर्ग एका हॉलमध्ये भरत होते. त्यावेळी मोठा गट व लहान गट असे एकुण १४ वर्ग भरत असत. तसेच पूर्व प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शाळा एकत्र भरत असे.

1996
१९९६

म.ए.सो.चे नियामक मंडळाचे सदस्य डॉ. क.कृ. क्षीरसागर व सौ. हेमा क्षीरसागर यांच्या हस्ते पूर्व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

1997
१९९७

पूर्व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीमध्ये उदकशांत विधी करण्यात आला.

2003
२००३

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे “आदर्श शाळा” म्हणून द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.

२००३

पूर्व प्राथमिक शाळेचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रीधर फडके यांचा ” फिटे अंधाराचे जाळे” हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

2006
२००६

हॉलच्या मागे पूर्व प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी स्वतंत्र अशी बाग उभारण्यात आली.

2011
२०११

शाळेत ३ वर्षे पूर्ण मुलांसाठी खेळवाडी गट सुरु करण्यात आले.

2012
२०१२

बदलत्या काळानुसार इंग्रजीचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्यात आले. त्यानुसार spoken English घेणाऱ्या शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली.

2013
२०१२-१३

युनिक फाऊंडेशन तर्फे “आदर्श शाळा ” म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

2022
२०२२

दीड ते चार वयोगटातील मुलांसाठी शाळेत activity center सुरु करण्यात आले.

शाळेचे आत्तापर्यंतचे मुख्याध्यापक :-

  • इ. स. १९७९ ते १९९१ पर्यंत मा. सौ. शैलजा लिमये यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला.
  • इ. स. १९९१ ते १९९२ पर्यंत मा. श्रीमती. उमा केळकर मुख्याध्यापक पदी काम केले.
  • इ. स. १९९३ पासून २००३ पर्यंत मा. श्रीमती. स्वाती फडणीस यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार साभाळला.
  • २००४ ते मार्च २०१० पर्यंत मा. श्रीमती. शुभदा उकिडवे शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.
  • एप्रिल २०१० ते सप्टेंबर २०१० पर्यंत मा. श्रीमती. अंजली दिवाकर शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.
  • ऑक्टोबर २०१० पासून ते आजपर्यंत मा. श्रीमती. मेधा दाते शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पहात आहेत.

 

 

 

Scroll to Top