क्रीडासप्ताह

म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत क्रीडासप्ताहाचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. २१ जानेवारी रोजी आनंदी वातावरणात पार पडला.
चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि social media पासून परावृत्त होऊन …. खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक विकास व्हावा आणि मित्रांबरोबर खेळाचा मनसोक्त आनंद घेता यावा या उद्देशाने या क्रीडासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडासप्ताहाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. सो चे सहाय्यक सचिव आणि म. ए. सो च्या क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. श्री सुधीरजी भोसले यांना आमंत्रित केले होते. तसेच शालासमिती अध्यक्ष मा. श्री. दिलीपजी शेठ आणि शालासमिती महामात्रा मा. श्रीमती. प्रणिता जोगळेकर सुद्धा आजच्या उद्घाटनास उपस्थित होते.

Scroll to Top